महाराष्ट्र

maharashtra

पालघर जिल्हा परिषद निवडणूक : राष्ट्रवादी ५, तर माकप ४ जागांवर विजयी

By

Published : Jan 8, 2020, 11:50 AM IST

Updated : Jan 8, 2020, 1:09 PM IST

पालघर जिल्हा परिषदेच्या मत मोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून जिल्ह्यात वर्चस्व निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर रणनीती आखल्याचे दिसून आले.

मतमोजणी
मतमोजणी

पालघर - जिल्हापरिषदेच्या 57 आणि पंचायत समितीच्या 114 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत 57 पैकी 14 जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये 5 जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. जिल्हापरिषद आणि पंचायत समितीसाठी मंगळवारी 62.50 टक्के मतदान झाले होते.

आत्तापर्यंत हाती आलेले निकाल -
एकूण जागा : 57
निकाल जाहीर : 14
शिवसेना : 1
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष : 4
भारतीय जनता पक्ष : 03
राष्ट्रवादी काँग्रेस : 05
बहुजन विकाल आघाडी : 1
महाराष्ट्र नवनिर्माण सेना : 0
अपक्ष : 0


भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून जिल्ह्यात वर्चस्व निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर रणनीती आखल्याचे दिसून आले आहे. काही तालुक्यांमध्ये बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर आघाडी झाली आहे.


मात्र, जिल्हास्तरवर अद्याप कोणतीही अधिकृत आघाडी झालेली नाही. त्यामुळे स्थानिक मुद्दय़ांवर ही निवडणूक लढली जात आहे. तिरंगी आणि चौरंगी लढतींमध्ये होणाऱ्या मतविभागणीचा लाभ कोणाला मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Last Updated : Jan 8, 2020, 1:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details