पालघर (वाडा) - जिल्ह्यातील वाडा तालुक्यात नाणे गावातील महीला स्वयंस्फूर्तीने गेली सहा ते सात वर्षांपासुन कुटीर उद्योगातून स्वतःच्या प्रपंचाचा गाडा हाकत आहेत. घरगुती उत्पादनांच्या माध्यमातून मिळणारी रक्कम यातून त्या घरातील आर्थिक गरजा भागवत आहेत.
नाणे येथील गौरी मंडळ हे गावातील महीलांच्या सहकार्याने पापड, लोणचे यांसारखे खाद्य पदार्थ तयार करतात. लग्न समारंभात आवश्यक खाद्य पदार्थांची ऑर्डर घेऊन या महिला इतर महिलांनाही रोजगार उपलब्ध करून देत आहेत. छोट्या मोठ्या उद्योगांच्या उभारणीसाठी शासकीय मदतीचा आधार हवा असतो. अथवा एखाद्या बँकेकडून आर्थिक मदत घ्यावी लागते. मात्र, नाणे गावातील गौरी मंडळाच्या महिला या घरातील कामे करता करता अन्न पदार्थांची निर्मिती करत आर्थिक नफा मिळवत आहेत.