वाडा (पालघर)- वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात एका 32 वर्षीय पुरुष व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे वाडा तालुक्यातील एकुण पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 4 झाली आहे तर पालघर ग्रामीण जिल्ह्यातील एकूण संख्या 61 झाली आहे. या रुग्णाला पालघरमधील टीमा येथे हलविण्यात आले असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध चालू आहे.
Corona : वाडा तालुक्यातील रुग्णांची संख्या 4 तर पालघर ग्रामीणमध्ये 61 कोरोनाबाधित - wada corona update
वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात एका पुरुष व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याव्यक्तीच्या संपर्कातील 13 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
32 वर्षीय रुग्ण मुंबई येथे कामाला असल्याने तो काही दिवस मुंबई तर काही दिवस गावी येत होता अशी माहिती मिळतेय. त्याच्या संपर्कातील 13 जणांना क्वारटाइन केल्याची माहिती वाडा तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बुरपल्ले यांनी दिली.
सारिची लक्षणे आढळल्याने युवकाची काही दिवसा कोरोना चाचणी घेण्यात आली होती. काल रात्री त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेरे यांनी दिली.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. वाडा तालुक्यात एकही रुग्ण नव्हता. आता या तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे. या अगोदर पोलीस कोठडीतील एका आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचे पाहिले प्रकरण होते. त्यांच्या संपर्कातील लोकांचे घेतलेले रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. वाडा तालुक्यात 2 शहरी भागात व 2 ग्रामीण भागात असे एकूण 4 असे आहेत.