महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर तालुक्यातील सफाळे येथे आढळला कोरोनाबाधित.. संक्रमितांची संख्या २८ वर - पालघर कोरोना

आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात या व्यक्तीमध्ये 'सारी/आयएलआय' लक्षणे आढळळून आली. त्यानंतर या व्यक्तीची कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

पालघर
पालघर

By

Published : May 9, 2020, 1:17 PM IST

Updated : May 13, 2020, 7:12 AM IST

पालघर - तालुुुक्यातील सफाळे येथे पुन्हा एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला असून 55 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. हा व्यक्ती मुबंईत बेस्टमध्ये चालक पदावर कार्यरत आहे. आरोग्य विभागामार्फत या भागात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात या व्यक्तीमध्ये 'सारी/आयएलआय' लक्षणे आढळळून आली. त्यानंतर या व्यक्तीची कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

पालघर
कोरोनाबाधित व्यक्तीच्या अति जोखमेच्या संपर्कातील 4 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. सफाळे येथे पुन्हा एकदा कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्याने पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या 28 वर पोहोचली आहे.

दरम्यान, कोरोनाबाधितांचा राज्यातील आकडा वाढतच असून शुक्रवारी नवीन १ हजार ८९ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १९ हजार ६३ झाला आहे.

Last Updated : May 13, 2020, 7:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details