पालघर- वसई-विरारमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव प्रत्येक गावागावात पोहोचला असून मृतांच्या आकडेवारीतही वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच वसईतील भालीवली येथे एकाच कुटुंबातील ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. वसईच्या पाटील कुटुंबातील आई, वडील व मुलगा या तिघांचा कोरोनाने अवघ्या ६ दिवसांत मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
वसईच्या भालीवली येथे एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने मृत्यू - एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू
वसईतील भालीवली येथे एकाच कुटुंबातील ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. वसईच्या पाटील कुटुंबातील आई, वडील व मुलगा या तिघांचा कोरोनाने अवघ्या ६ दिवसांत मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
भालीवली येथील पाटील कुटुंबातील रामचंद्र पाटील (वय 72) यांचा १४ एप्रिलला उपचार सुरू असताना मृत्यू झाला. लगेचच दुसऱ्या दिवशी त्यांची पत्नी रेखा पाटील (वय ६८) यांचाही मृत्यू झाला. यात दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच पाटील कुटुंबातील त्यांचा मुलगा गणेश रामचंद्र पाटील (वय ३५) याचेही सहाव्या दिवशी उपचारादरम्यान रूग्णालयात निधन झाले. त्यामुळे संपूर्ण पाटील कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या तिघांनाही वेळेवर इंजेक्शन, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, प्लाझ्मा न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांकडून आरोप करण्यात आला आहे.