पालघर - महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली असून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या 24 तासांमध्ये 4 कोरोनाबाधित आढळले आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या 95 वर पोहचली असून यात 44 केसेस अॅक्टीव्ह आहेत. दिलासादायक बाब म्हणजे 48 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पालघर ग्रामीणमध्ये आढळले 4 नवे रुग्ण ; एकूण रुग्णांची संख्या 95 वर - palghar corona news
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या 24 तासांमध्ये 4 कोरोनाबाधित आढळले आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या 95 वर पोहचली असून 44 केसेस अॅक्टीव्ह आहेत.

पालघर ग्रामीणमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून 44 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पालघर ग्रामीणमध्ये आज आढळलेले सर्व रुग्ण हे वसई ग्रामीण भागातील आहेत. वसई तालुक्यातील अर्नाळा येथील 22 वर्षीय महिला व 19 वर्षीय मुलगा कोरोनाबधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
रानगाव, हनुमानआळी येथील ५३ वर्षीय व्यक्ती मुंबई येथे सेक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत आहे. या रुग्णाची कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आढळून आला. तसेच भाटी बंदर, टेम्भी-कोलापूर येथील ३२ वर्षीय व्यक्ती मुंबई येथे एका हॉटेलमध्ये कार्यरत आहे. या व्यक्तीची कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आढळून आला.