पालघर- पालघर जिल्ह्यातील वसई-विरारसह सर्वच तालुक्यात शुक्रवारपासून जोरदार पाऊस बरसत आहे. याचा परिणाम पश्चिम रेल्वेवरही झाला असून विरार स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 चा कोपरा खचला आहे. रेल्वे प्रशासनाने खचलेल्या भागाच्या आसपास बॅरिकेट लावून दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. यामुळे लोकल ट्रेन बफरपासून काही मीटर लांब अंतरावर थांबत आहेत.
विरार स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 चा कोपरा खचला - प्लॅटफॉर्म क्रमांक 3
मागील दोन दिवसांपासून मुंबईसह परिसरात पावसाने जोर धरला आहे. यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून सुटका झाली असली तरी दुसरीकडे याचा मोठा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला बसला आहे.
विरार स्थानक
मागील दोन दिवसांपासून मुंबईसह परिसरात पावसाने जोर धरला आहे. यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून सुटका झाली असली तरी, दुसरीकडे याचा मोठा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला बसला आहे. यात पहिल्याच पावसात विरार स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 चा कोपरा खचला आहे.
Last Updated : Jun 29, 2019, 3:10 PM IST