महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गाडी पार्किंग करण्यावरून वाद ,फाऊंटन हॉटेलवर दगडफेक - crime news

फाऊंटन हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी महिलांवर हात उचलल्याने गावकरी संतप्त झाले होते. त्यांनी हॉटेलवर दगडफेक करत तोडफोड केली असून यात काही लोक जखमी झाले आहेत. यात एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे.

फाऊंटन हॉटेल

By

Published : Oct 7, 2019, 9:09 AM IST

पालघर/ भाईंदर - शनिवारी रात्री उशिरा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर फाऊंटन हॉटेलच्या कर्मचारी आणि स्थानिक गावकऱ्यांमध्ये गाडी पार्किंग करण्यावरून वाद झाला. त्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

संजय पाटील (अप्पर पोलीस अधीक्षक, मीरा भाईंदर )

फाऊंटन हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी महिलांवर हात उचलल्याने गावकरी संतप्त झाले होते. त्यांनी हॉटेलवर दगडफेक करत तोडफोड केली असून यात काही लोक जखमी झाले आहेत. यात एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच काशी मीरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला शांत केले. याप्रकरणी दोन्ही गटाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details