पालघर - वसई विरारमध्ये सोमवारी रात्रीपासून पाऊस पडत आहे. यामुळे शहरातील सखल भागातील रस्ते जलमय झाले आहेत. सकाळपासून वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलाच जोर धरल्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळुन पडली. त्यामुळे वाहतुकीस अडथडा निर्माण झाला आहे.
वसई विरारमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार; अनेक ठिकाणी झाडांची पडझड - vasai rain news
वसई विरारमध्ये सोमवारी रात्रीपासून पाऊस पडत आहे. यामुळे शहरातील सखल भागातील रस्ते जलमय झाले आहेत. सकाळपासून वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलाच जोर धरल्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळुन पडली. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.
रात्रीपासून रिमझिम बरसत असलेल्या पावसाने सकाळपासून वादळी वाऱ्यासह चांगलाच जोर धरला. यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागात रस्त्याकडेला असलेल्या झाडांची पडझड झाली. विरार येथील जीवदानी मार्गावर व वसईतील गिरीज गावात रस्त्यावर मोठी झाडे कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर पाणी साचलेल्या भागात महापालिकेच्या वतीने पाणी उपसणारे पंप लावण्यात आले असून गटारातील अडकलेले प्लास्टिक काढण्याचे काम सुरू आहे. मांडवी परिसरात ९८ मिमि. , आगशी ८० मिमि, निर्मळ ७९ मिमि. व विरार ९५ मिमि., तर, वसईत १७५ मिमि. पावसाची नोंद करण्यात आली आहे.