शरद पवारांकडून राष्ट्रवादीचे दिवंगत नेते राजेश पारेख यांच्या कुटुंबियांच सांत्वन - माजी नगराध्यक्ष राजेश पारेख यांचे अकस्मात निधन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डहाणू तालुक्यातील नेते माजी नगराध्यक्ष राजेश पारेख यांचे काही दिवसांपूर्वी अकस्मात निधन झाले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी डहाणू येथे पारेख यांच्या कुटुंबियांची भेट घेवून श्रद्धांजली वाहिली.
पालघर- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डहाणू तालुक्यातील नेते माजी नगराध्यक्ष राजेश पारेख यांचे काही दिवसांपूर्वी अकस्मात निधन झाले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डहाणू येथे पारेख यांच्या कुटुंबियांची भेट घेवून श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. राजेश पारेख यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता हरपला, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी ट्विट करत व्यक्त केली आहे.
डहाणू येथीलच राष्ट्रवादीचे पदाधिकारी रमेश कर्णावत आणि मुकुंद चव्हाण यांचे देखील या काळात निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांची देखील भेट घेत शरद पवारांनी सांत्वन केले.