पालघर -पालघरमधील आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी केंद्रांचा सावळागोंधळ सुरू आहे. याचा मोठा फटका येथील शेतकर्यांना बसत आहे. 32 क्विंटल उत्पादन येत असल्याचा अहवाल असतानादेखील 18 क्विंटल भात खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचा उर्वरित भात शिल्लक राहत आहे. त्यामुळे उर्वरित भात विकायचा कुठे?, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
32 क्विंटल उत्पादनाचा अहवाल -
पालघर जिल्ह्यात भात हे मुख्य पीक असून जवळपास 75 हजार हेक्ट क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाते. मात्र शासनाकडून आदिवासी विकास महामंडळामार्फत भात खरेदी केंद्रांवर सध्या हेक्टरी 18 क्विंटलची मर्यादा (1800 किलो ) असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यातील प्रति हेक्टर मागील सरासरी उत्पादन हे 18 क्विंटल असले तरीही प्रत्यक्षात जास्तीत जास्त उत्पादन हे 32 क्विंटलपर्यंत येत असल्याचा अहवाल या महामंडळाला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.