पालघर -पालघर तालुक्यातील बोईसर चिल्हार फाटा येथे गुजरातहून आणलेल्या स्फोटकांनी भरलेले दोन टेम्पो पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने जप्त केले. जप्त केलेल्या या स्फोटकांमध्ये जिलेटिन व डिटोनेटरचा समावेश आहे. पोलिसांनी वाहनांसोबत, २ वाहन चालकांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
चिल्हार फाट्यावर स्फोटकांनी भरलेले टेम्पो जप्त; पालघर गुन्हे शाखेची कारवाई
पालघर जिल्ह्यात दगड खदानी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा वापर केला जातो. जिल्ह्यात वापर होत असलेल्या स्फोटकांची संख्या पाहता, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी बेकायदा स्फोटके बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईचे सत्र सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वीच विरार येथून स्फोटके जप्त करण्यात आली होती.
पालघर जिल्ह्यात दगड खदानी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा वापर केला जातो. जिल्ह्यात वापर होत असलेल्या स्फोटकांची संख्या पाहता, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी बेकायदा स्फोटके बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईचे सत्र सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वीच विरार येथून स्फोटके जप्त करण्यात आली होती. तसेच नागझरी येथे जिलेटिनचा वापर करून मासेमारी करणाऱ्या एका व्यक्तीला जीवही गमवावा लागला होता.
या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने आपली गस्त वाढवली आहे. याच गस्तीदरम्यान बोईसर चिल्हार फाट्यावर शुक्रवारी सकाळच्या सुमारास हे दोन संशयित टेम्पो त्यांना आढळून आले. या टेम्पोची झडती घेतली असता, त्यात स्फोटके पोलिसांना आढळून आली. या स्फोटकांची वाहतूक कुठे केली जात होती, तसेच स्फोटकांचा वापर कुठे करण्यात येणार होता? याबाबत अधिक चौकशी पोलीस करत आहेत.