पालघर - नगरपरिषद हद्दीत करोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून पालघर नगरपरिषद कार्यक्षेत्रात आजपासून (14 ऑगस्ट) 18 ऑगस्ट पर्यंत पाच दिवस लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. यादरम्यान नगरपरिषद हद्दीतील परिसरात निर्जंतुकीकरण देखील करण्यात येणार आहे.
पालघर नगरपरिषद हद्दीत आजपासून 18 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन
नगरपरिषद हद्दीत करोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून पालघर नगरपरिषद कार्यक्षेत्रात आजपासून (14 ऑगस्ट) 18 ऑगस्ट पर्यंत पाच दिवस लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे.
पालघर नगरपरिषद हद्दीत आजपासून 18 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन
या लॉकडाऊन दरम्यान शहरातील सर्व दुकाने, हॉटेल, औद्योगिक आस्थापने, भाजी व मासळी बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामधून औषधाची दुकाने तसेच दुग्धालयांना वगळण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून इतर वाहनांवर वाहतूक बंद ठेवण्याचे आणि इतर वाहनांना इंधन न देण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.