पालघर- तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नंबर एम 2, ए. एन. के फार्मा प्रायव्हेट लिमिटेड (तारा नायट्रेट) या कंपनीत 11 जानेवारीला झालेल्या दुर्घटनेप्रकरणी बोईसर पोलिसांनी कंपनीमालक नटवरलाल पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुर्घटना घडल्याच्या तब्बल 6 दिवसानंतर ही गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील दुर्घटनेप्रकरणी कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल - पालघर जिल्हा बातमी
11 जानेवारीला सायंकाळी 6.50 वाजण्याच्या सुमारास तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ए.एन.के फार्मा कंपनीत झालेल्या भीषण स्फोटामध्ये 8 कामगारांचा मृत्यू झाला होता.
![तारापूर औद्योगिक क्षेत्रातील दुर्घटनेप्रकरणी कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल Tarapur Industrial Area](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5755951-thumbnail-3x2-mum.jpg)
11 जानेवारीला सायंकाळी 6.50 वाजण्याच्या सुमारास तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ए.एन.के फार्मा कंपनीत झालेल्या भीषण स्फोटामध्ये 8 कामगारांचा मृत्यू झाला होता. तर इतर 7 व्यक्तींना गंभीर दुखापती झाल्या होत्या. ज्या प्रसंगी हा अपघात घडला त्याप्रसंगी रिअॅक्टरमध्ये अकुशल कामगारांकडून उत्पादन घेतले जात होते. हा अपघात घडला त्या वेळेला तांत्रिक माहिती असलेला 1 कामगार मृत पावला असून कंपनीचे मालक गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
रिअॅक्टरमधील रासायनिक प्रक्रिया, स्फोटक पदार्थांबाबत तसेच यंत्रसामग्रीबाबत निष्काळजीपणाचे वर्तन केल्याचा ठपका ठेवून कंपनीचे मालक नटवरलाल पटेल यांच्याविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.