महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरमध्ये सॅलवेशन ग्रुप ऑफ कंपनीकडून ग्राहकांना ६० लाखांचा चुना, तिघांना अटक - 60 lakh rupees

सदस्य आणि गुंतवणूकदारांमार्फत कंपनीमध्ये सुमारे ६० लाख रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीच्या काळात सदस्यांना आणि गुंतवणूकदारांना काही मोबदला मिळाला. त्यानंतर मात्र २-३ वर्षे उलटून गेल्यानंतरही त्यांचे पैसे परत मिळाले नाही.

फसवणूक झालेले ग्राहक

By

Published : May 9, 2019, 11:49 AM IST

Updated : May 9, 2019, 12:46 PM IST

पालघर - पालघरमध्ये एका गुंतवणूक कंपनीने पैसे दुप्पट करून देण्याचे आमीष दाखवून ग्राहकांना ६० लाख रुपयांचा चुना लावला आहे. सॅलवेशन ग्रुप ऑफ कंपनी, असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीने सुमारे ४०० जणांना कंपनीचे सदस्य करून घेत त्यामार्फत ही गुंतवणूक केली होती. कंपनीविरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूक झालेले सद्स्य आणि ग्राहक

सॅलवेशन ग्रुप ऑफ कंपनी या कंपनीने पैसे गुंतवा आणि काही वर्षांनी दुपटीने पैसे परत मिळवा, अशा वेगवेगळ्या स्कीमचे आमीष ग्राहकांना दाखवले. तसेच पालघर तालुक्यातील आणि अन्य तालुक्यातील लोकांना कंपनीचे सदस्य बनवले. या सदस्यांमार्फत त्यांच्या ओळखीने या सद्स्यांनी अन्य सदस्य आणि गुंतवणूकदारांमार्फत या कंपनीमध्ये सुमारे ६० लाख रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीच्या काळात सदस्यांना आणि गुंतवणूकदारांना काही मोबदला मिळाला. त्यानंतर मात्र २-३ वर्षे उलटून गेल्यानंतरही त्यांचे पैसे परत मिळाले नाही.

पालघर येथे कंपनीचे काम पाहणारे नंदन आणि जागृती म्हात्रे यांना सदस्यांनी जाब विचारला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. तसेच अनेकवेळा संपर्क साधण्याचा आणि भेटण्याचा प्रयत्न केला असता दोघांनीही पळवाट काढली. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कंपनीच्या सुमारे ४०० सदस्यांनी एकत्र येत पालघर पोलीस ठाण्यात धाव घेत कंपनीविरोधात तक्रार दाखल केली.

पालघर पोलीस ठाण्यात कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कंपनीचे डायरेक्टर संजू नून याला भाईंदर येथून, तर पालघर-माहीम येथील नंदन आणि जागृती म्हात्रे या तिघांना अटक केली आहे. तिघांना पालघर सत्र न्यायालयात हजर केले असता १० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Last Updated : May 9, 2019, 12:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details