पालघर (वाडा) - जिल्ह्यातील वाडा तहसीलदार कार्यालयासमोर कम्युनिस्ट पक्षाकडून विविध मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध मागण्या मांडण्यात आल्या. या आंदोलनाचे नेतृत्व कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमिटी सदस्य सुनिल धानवा यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
धनगर समाजाला देण्यात येणारे आदिवासींचे आरक्षण व सोयी-सवलती बंद करा - reservation for reservation
आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी वाडा तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी कम्युनिस्ट पक्ष अंगीकृत असलेल्या विविध संघटनांनी यावेळी उपस्थित राहून पाठिंबा दिला होता.
यावेळी आदिवासी समाजाचे आरक्षण हिरावून घेऊ नका, तालुक्यातील वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करून वन जमिनी कसत असलेले प्लॉट तातडीने आदिवासींच्या नावे करा, आदिवासी समाजाच्या सोयी-सवलती धनगर समाजाला देण्याचे बंद करा आणि त्यांना स्वतंत्र कोट्यातून सवलती द्या, रोजगार हमी योजनेतून कुशल-अकुशल बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, तसेच येथील कारखानदारीत स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी, जिल्हा परिषद शाळा व आश्रमशाळा यांच्या सोयी-सुविधा वाढवण्यात याव्यात, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
त्याचबरोबर रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत लक्षून वेधत रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवावेत अशा विविध मागण्यांसाठी वाडा तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी कम्युनिस्ट पक्ष अंगीकृत असलेल्या विविध संघटनांनी यावेळी उपस्थित राहून पाठिंबा दिला होता.