पालघर - माहीम रोडवरील परिसरात राहणारे समीर मणियार यांच्या बंगल्याच्या आवारात रविवारी कोब्रा (नाग) आढळून आला. गार्डनमध्ये साप असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्पमित्रांना संपर्क केला. यानंतर सर्पमित्र सागर बारोत यांनी सदर ठिकाणी धाव घेत हा साप पकडला. या कोब्रा सापाची लांबी 5 फुटांपेक्षाही अधिक आहे. सर्पमित्राने या कोब्राला सुरक्षितस्थळी सोडले आहे.
पालघर-माहीम रस्त्यावर एका घराजवळ आढळला 'कोब्रा'; सर्पमित्राकडून जीवदान - Palghar-Mahim road
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. यामुळे सध्या रस्ते आणि शहरांमध्ये शुकशुकाट आहे. मात्र, याच काळात अनेक वन्यप्राणी शहर, वस्ती आणि रस्त्यांवर मुक्तपणे वावरताना पाहायला मिळत आहेत.
पालघर-माहीम रस्त्यावर एका घराजवळ आढळला 'कोब्रा'
हेही वाचा...चंदीगढचा एक अवलिया लॉकडाऊनमध्ये पक्ष्यांना पुरवतोय अन्न