पालघर -पालघर जिल्ह्यातील ( Palghar District ) जव्हार तालुक्याच्या ( Jawhar Taluka ) रातोना गावात राहणारे कोब्रा कमांडो रामदास भोगाडे ( Cobra Commando Ramdas Bhogade ) यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गावातील रस्ता बनवून देण्याचे साकडे घातले आहे. रामदास भोगाडे हे विकलांग आहेत. 29 नोव्हेंबर 2017 रोजी छत्तीसगड राज्यातील सुकमा येथे झालेल्या नक्षली हल्ल्यात ते धैर्याने लढले. परंतू दुर्दैवाने बॉम्बस्फोटात ( Injured In Sukma Bomb blast ) ते गंभीर रित्या जखमी झाले. यात त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्त्यांकडे सरकराचे दुर्लक्ष -याबाबत सविस्तर वृत्त असे की पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वडोली रातोना गावातील कोब्रा कमांडो रामदास भोगाडे ह्या दोन्ही पायांनी विकलांग असलेल्या कमांडोला गावातील रस्त्या अभावी चिखल व मातीतून कृत्रिम पायाने चालत जावे लागते. आतापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी वडोली रातोना गावातील रस्त्यांकडे दुर्लक्ष केल्याने गावातील रस्त्याअभावी कोब्रा कमांडोला असाच सामना करावा लागत आहे. त्यांच्या घरापासून जवळपास १५० मीटर रस्ता केवळ पायवाट आहे. पाण्यातून तसेच शेताच्या बांधावरून त्यांना पायी खडतर प्रवास करावा लागतो.
कृत्रिम पायांचा वापर -कोब्रा कमांडो रामदास भोगाडे हे 29 नोव्हेंबर 2017 रोजी छत्तीसगड राज्यात सुकमा येथे झालेल्या नक्षली हल्ल्यात धैर्याने लढले परंतु दुर्दैवाने बॉम्बस्फोटात ते जखमी होऊन दोन्ही पायाने विकलांग झाले होते. सध्या ते पुणे ग्रुप सेंटर ( Pune Group Center ) येथे सैन्यात कार्यरत असून ते आपल्या गावाकडे वडोली रातोनापाडा ( Vadoli Ratonapada village ) येथे सुट्टी असलेकी ये-जा करतात परंतू त्यांना काही कामांकरिता घराबाहेर जायचे झाल्यास त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे चिखल माती असून तेथून जाण्यासाठी शेताच्या बांधावरून पायवाट काढत चालत जावे लागते. दोन्ही पाय गमवावे लागल्याने प्लास्टिकच्या कृत्रिम पायांवर ( artificial leg ) चिखल मातीचा रस्ता तुडवत चालत जावे लागते. अनेक वेळा त्यांची पत्नी त्यांना पाठीवर घेऊन पाण्यातून वाट काढते.