महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मीरा रोडच्या गोल्ड एक्सप्रेस कंपनीकडून हजारो ग्राहकांना कोट्यवधीचा गंडा; दोघे ताब्यात - मीरा रोड

मागील तीन दिवसांपासून हे कार्यालय बंद असून कंपनीशी कोणताही संपर्क होत नसल्याने हजारो ग्राहकांनी पोलीस ठाणे गाठून गोंधळ घातला. या कंपनीच्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

हजारो ग्राहकांनी पोलीस ठाणे गाठून गोंधळ घातला

By

Published : Sep 14, 2019, 9:51 PM IST

Updated : Sep 14, 2019, 10:18 PM IST

पालघर-मीरा रोड येथील गोल्ड एक्सप्रेस नावाच्या कंपनीने हजारो ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे कार्यालय बंद असून कंपनीशी कोणताही संपर्क होत नसल्याने हजारो ग्राहकांनी पोलीस ठाणे गाठून गोंधळ घातला.

पोलीस अधिकारी आणि पीडित महिलेची प्रतिक्रिया

या कंपनीने ग्राहकांना दलालांच्या मार्फत लाखो रुपयांचा मुदतठेवी जमा केली व दर महिना व्याज मिळेल असे सांगून हजारो ग्राहक या कंपनीत जोडले. या आमिषाला बळी पडून मुंबई सह उपनगरातील हजारोच्या संख्येने नागरिकांनी पैसे गुंतवले. यानंतर या कंपनीने पैसे आज देतो, उद्या देतो असे सांगितले. मात्र गेल्या तीन दिवसांपासून हे कार्यालय बंद असून कंपनीशी कोणताही संपर्क होत नाही.

हेही वाचा - महाजनादेश यात्रेत 'एकच वादा अजित दादा'चा जयघोष, पोलिसांचा लाठिचार्ज

मीरा रोड पूर्व येथील पूनम सागर रोड येथे गोल्ड एक्सप्रेस कंपनीचे आलिशान कार्यालय आहे. या कंपनीधारकांनी मुंबईसह उपनगरातील हजारो ग्राहकांना मुदतठेवी भरून महिन्याचे व्याज मिळेल, अशी जाहिरात दलालांमार्फत केली. कंपनीच्या या आमिषाला बळी पडून मीरा रोडसह मुंबई उपनगरातील ग्राहकांना जोडले. त्यांच्याकडून एक लाख ते कोट्यवधी रुपयांपर्यंतचे पैसे कंपनीने लुटले.

हेही वाचा - 'वंचित'मुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत फायदा - शरद पवार

कंपनीने सुरुवातीला काही ग्राहकांना व्याज दिले असल्याने त्यांनी या ऑफरवर विश्वास ठेवला व रक्कम जमा करून या कंपनीकडे दिली. अनेकांना रक्कम मिळाली नसल्याने महिन्याभरापासून ग्राहक या कंपनीत येत होते. मात्र त्याच्या तक्रारींना न जुमानता या कंपनी मालकांनी कंपनीला टाळे ठोकून फरार झाले. अखेर हताश झालेल्या हजारोच्या संख्येने ग्राहकांनी नया नगर पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. या कंपनीच्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत..

हेही वाचा - 'उदयनराजे दिवस-रात्र काय करतात जनतेला ठाऊक, मतदाराच त्यांना दाखवतील'

Last Updated : Sep 14, 2019, 10:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details