पालघर - मोदी सरकारचा महत्वकांक्षी असलेल्या प्रकल्पापैकी एक असलेल्या वाढवण प्रकल्पास स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. मात्र, हा प्रकल्प सामंजस्याने पुढे गेला पाहिजे असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरातून बाहेर पडून या प्रकल्प ग्रस्तांच्या समस्या विचारात घेऊन त्यांतून मार्ग काढण्यासाठी मोदींची भेट घ्यायला हवी, असा टीकात्मक सल्लाही यावेळी दिला आहे.
चंद्रकांत पाटील हे माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुबीयांचे सांत्वन करण्यासाठी वाडा येथे आले होते. त्यावेळी वाढवण प्रकल्पास विरोध करणाऱ्यांनी पाटील यांची भेट घेऊन त्यांचे मत पाटील यांच्या समोर मांडले.
समजुतीने हा प्रकल्प पुढे घेऊन जाणे गरजेचे-
यावर बोलताना पाटील म्हणाले, वाढवण बंदर सामज्यास्याने पुढे गेला पाहिजे. तसेच या प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी देखील पुढाकार घेऊन आंदोलनकर्त्याचे प्रश्न एकला पाहिजे. अशा प्रकारच्या विकास प्रकल्पातून काही नागरिकांचे नुकसान होतच असते. त्यासाठी विरोध होणे साहजीकच आहे. मात्र, सामज्यासाने आणि समजुतीने हा प्रकल्प पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे. जर एखादे धरण बांधायचे असल्यास अनेक जणांच्या जमिनी पाण्याखाली जातात. मात्र, हजारो एकर जमीन ओलीताखाली येतात. त्याच प्रमाणे या प्रकल्पाबाबतही विचार झाला पाहिजे असे मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
सामज्यास्याने प्रक्लप पुढे गेला पाहिजे. कायदे दाखून, दंडेलशाही करून आणि नुकसानी भरपाईची आमिष दाखवून असे प्रकल्प करता येत नाहीत. मात्र, बंदर झालेच नाही तर येथील नागरिकांना रोजगार कसा मिळणार? व्यापार कसा होणार, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडले पाहिजे-
मुख्यमंत्री ठाकरे यांनी वाढवण बंदर प्रश्नी हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना बरोबर घेऊन केंद्रात गेले पाहिजे. राज्याचे प्रश्न त्यांनी केंद्रात न्यायला हवेत यापूर्वी कोरोना काळ होता. मात्र, आता ठाकरे यांनी घराबाहेर पडावे. आदोलकांचे प्रश्न समजून घ्यावे. तसेच मोदींची भेट घेऊन राज्यातील प्रश्न मार्गी लावले पाहिजेत असेही मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.