पालघर (वाडा) -पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. देशासह राज्यात करोना विषाणूची भीती असल्याने विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिक गर्दी टाळत आहेत. याचा परिणाम धुळवडीवर होत आहे. तरी उत्साहाने ही धुळवड साजरी होताना दिसत आहे.
धुलीवंदनानिमीत्त आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा बोहाडा उत्सव हेही वाचा -COVID-19 : नाशिकमध्ये आणखी एक आढळला कोरोना सदृश्य रुग्ण
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात लहान मुले धुळवडीच्या दिवशी जिल्हा ग्रामीण रस्त्यावर वाहन चालकांची रस्त्यात बांबूच्या काठीने अडवणूक करून त्यांच्याकडून पोसत (पैसे) मिळवत असतात. त्यात त्यांना मोठा आनंद मिळत असतो. रस्त्यातून जाणारे पादचारीही खुशीने 5 ते 10 रुपये देत असतात. नाही दिले तर त्यांच्यावर रंगांची बरसात होत असते. जिल्ह्यातील तिलसे येथे होळीच्या दिवशी मोठा बाजार भरत असतो. हा 50 वर्षांपूर्वीपासून भरत असल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर धुळवडीच्या दिवसापासून ते आठ दिवसांपर्यंत जिल्ह्यातील मोखाडा या आदिवासी भागात बोहाडाचे आयोजन केले जाते. येथे जगदंबा मातेचे मंदीर आहे. जगदंबा मातेच्या उत्सवाच्या माध्यमातून या बोहाड्यात आदिवासी समाजजीवनाचे आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडत असते.
या बोहाड्यातरात्रीदेवी-देवतांचे सोंगनिघत असतात. दिवसभरात यात्रा स्वरुप असते आणि रात्री सोंग नाचवली जातात. हा बोहाडा तीनशे वर्षापासून चालत असल्याचे स्थानिक सांगतात. यावेळी रोजगारासाठी स्थलांतरीत आदिवासी समाज या होळी सणाला व बोहाड्यात येत असतात. होळी सण आला की हौशी व्यक्ती बहुरुपी घेऊन दारोदारी पोसत(पैसे) घेत असतात.
हेही वाचा -मुंबईत कोरोनामुळे धुलिवंदनाच्या उत्साहावर विरजण; फक्त चिमुकल्यांकडून धुळवड साजरी