महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Child Kidnapping Case : चिमुकलीच्या अपहरणाचा दोन तासात लावला छडा; पोलिसांचे टाळ्यांच्या गजरात आभार

पालघर येथील विष्णूनगर येथील वर्धमान सृष्टी या इमारतीत राहणाऱ्या एका पाच वर्षीय मुलीचे दुपारी साडेतीनच्या दरम्यान अपहरण (child kidnapping case Palghar) करण्यात आले होते. अपहरणाचा फोन (kidnapping Phone) तिच्या घरच्यांना आल्यानंतर त्याबाबतची माहिती पालघर पोलिसांना (Palghar Police) देण्यात आली.

Child Kidnapping Case
Child Kidnapping Case

By

Published : Oct 25, 2022, 4:54 PM IST

पालघर: पालघर येथील विष्णूनगर येथील वर्धमान सृष्टी या इमारतीत राहणाऱ्या एका पाच वर्षीय मुलीचे दुपारी साडेतीनच्या दरम्यान अपहरण (child kidnapping case Palghar) करण्यात आले होते. अपहरणाचा फोन (kidnapping Phone) तिच्या घरच्यांना आल्यानंतर त्याबाबतची माहिती पालघर पोलिसांना (Palghar Police) देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आपली टीम तयार करून केळवे उसरणी येथे पाठविली. सायंकाळी सातच्या दरम्यान ती सुखरूप असल्याचे पोलिसांकडून समजतात नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. (Palghar Crime) (latest news from Palghar)


चिमुकलीचे अपहरण झाल्याचा फोन -भार्गवी बापू जगताप (वय वर्षे 5) ही पालघर येथील वर्धमान सृष्टी या इमारतीत वास्तव्याला आहे. तिच्या शेजारी राहणारे नातेवाईक कांबळे यांनी दुपारी साडेतीन वाजता तिला फिरायला नेतो असे सांगून तिला घराबाहेर नेले. त्यानंतर सनी कांबळे यांनी 4:30 वाजता त्या मुलीचे पालक बापू जगताप यांना फोन केला व तुमच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याचे कळविण्यात आले. त्यांच्याकडे सर्वप्रथम एक लाख वीस हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर एकत्रित पैसे न देता वीस-वीस हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी त्या मुलीच्या वडिलांकडे केली. त्यानंतर त्याच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले. तरीही तो आपल्या अधिक पैशाच्या मागणीवर ठाम होता.

पोलिसांचे टाळ्यांच्या गजरात आभार -अपहरणकर्ता सनी कांबळे याने त्या मुलीच्या वडिलांना फोन केल्यावर त्याचे ठिकाण ट्रेस करण्यात आले. त्यानंतर पालघर पोलिसांची एक तुकडी येथे रवाना झाली. दुसरीकडे केळवा येथे त्याच्या शोध घेत होती. त्यानंतर त्याला केळवे रोड स्टेशनवर पकडण्यात आले. त्यानंतर त्याला खासगी वाहनाने पालघर येथे आणण्यात आले. त्यानंतर पालघरला आल्यावर त्या मुलीच्या नातेवाईकांनी व उपस्थित हितचिंतकांनी पालघर पोलिसांचे टाळ्यांच्या गजरात आभार मानले. हा यशस्वी तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे, पोलीस नाईक रमेश पालवे, भगवान आव्हाड, सागर राऊत, कल्पेश पाटील यांनी तिला शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

ABOUT THE AUTHOR

...view details