पालघर- राज्यपालांना हेलीपॅड नाकरले गेले हा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. पालघर येथील जव्हार भागात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एका दौऱ्यानिमित्त आले होते. त्यांनी यावेळी सर्वांची विमाने उतरलतील, अशी धावपट्टी तयार करायची आहे, असे खोचक वक्तव्य प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. जिल्ह्यातील जव्हार भागात त्यांनी धावता दौरा केला.
या भागात कुपोषणाचे प्रमाण जास्त असून बालमृत्यूची समस्या गंभीर आहे, असे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे. हा माझा पहिला दौरा असून तो धावता दौरा आहे. यापुढे मी जव्हारला भेट देईन. या भागात कुपोषणामुळे होणारी कोवळी पानगळ थांबवण्याचे आव्हान आहे. कुपोषण कमी करायचे आहे. आदिवासी संस्कृतीची जपणूक करून विकास साधायचा आहे.
कुपोषणाची समस्या सोडवायची आहे.
पालघर जिल्हा नवीन निर्माण झाल्याने येथे सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, हे शासनाचे काम आहे. कुपोषणाची समस्या कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच जव्हार हिल स्थानक आहे. येथे पर्यटन विकास करून यातूनही कुपोषणाची समस्या सोडवायची आहे. त्याचबरोबर आदिवासी समाजाची संस्कृती जपून येथील विकास साधायचा आहे. त्याचबरोबर येथील पाण्याचा प्रश्न, पर्यटन विकास करायचा आहे. जेणे करून येथील समस्या सुटतील.
राज्यपालांचे विमान प्रकरण काय?
काल (गुरुवारी) 11 फेब्रुवारीला राज्यपाल यांना उत्तराखंड येथे कार्यक्रमानिम्मित जायचे होते. मात्र, त्यांच्या विमान प्रवासाला राज्यसरकारकडून नकार कळवण्यात आला. त्यामुळे राज्यपालांना विमानातून खाली उतरण्याची नामुष्की आली. त्यानंतर राजकीय बराच वादही पेटला. त्यामुळे आज राजभवनावर जाऊन तेथील हेलिपॅड वापरणेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळले.