पालघर- कोरोना काळात मोठ्या शहरांमध्ये घर खरेदीचे पॅटर्न आता बदलले आहे. आता लोक गर्दीच्या ठिकाणी घरे घेण्यास नकार देत आहे. त्यामुळे डेव्हलपर्सने देखील शहराबाहर घरे तयार करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना महामारीची पार्श्वभूमी लक्षात घेता, लोक शहराबाहेर सुरक्षिततेसाठी घरे घेण्याचा विचार करत असल्याचे प्रॉपर्टी कन्सल्टंट एनरॉकच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
शहराबाहेर घरे घेण्याच्या प्रमाणात वाढ
कोरोना नंतर शहराबाहेर घरे घेण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे, मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनने (एमएमआर)मध्ये पनवेल, पालघर, वसई, विरार, बदलापूर, भिवंडी आणि डोंबिवली या शहरांमध्ये 67% नवीन घरे लॉन्च केले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात ही आकडेवारी 60% होती. मुंबईपासून काही अंतरावर पालघर जिल्हा आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भाग निसर्ग, समुद्र आणि नद्यांनी नटलेला आहे. हा जिल्हा आदिवासी बहुल आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिकांनी गर्दी व कोरोना टाळण्यासाठी व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पालघर, बोईसर, सफाळे, वाडा शहरापासून काही अंतरावर घर घेण पसंत केले आहे.
डेव्हलपर्समार्फत ग्रामीण भागात व शहरांबाहेर घरांची उभारणी