पालघर:मनोर/ पालघरला जिल्हा मुख्यालय झाल्यापासून मनोर पालघर (Manor Palghar) रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. नंडोरे नाका, डुंगीपाडा, गणेश नगर, घोलविरा भागात मोठ्या संख्येने रहिवासी इमारतींचे बांधकाम झाले आहे. त्यामुळे नागरी वस्तीत वाढ झाली आहे. रस्त्यालगत सेंट जॉन कॉलेज आणि वेवुर भागात औद्योगिक वसाहत असल्याने विद्यार्थी आणि कामगारांची मनोर पालघर रस्त्यावर वर्दळ असते. औद्योगिक वसाहतींमध्ये अवजड वाहने मोठ्या संख्येने येत असतात. डीएफसी आणि रेल्वे चौपदरीकरणा सारख्या राष्ट्रीय प्रकल्पांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात माती, मुरूम आणि खडी पावडर सारख्या गौण खनिजाची वाहतूक मनोर पालघर रस्त्यावरून होत आहे.
रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष:(Neglect of road maintenance work) वाघोबा खिंडीतील पावसाचे पाण्याचा पावसाच्या पाण्याच्या निचरा होण्यासाठी असलेली गटारे तुंबल्याने पावसाळ्यात पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. रस्त्यावरून पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाघोबा खिंडीच्या पालघर बाजूकडील चौथ्या वळणावर रस्ता खचला आहे.रस्त्याच्या कडेला तीन ते चार फूट खोल खड्डा पडला आहे. रस्त्यालगत दोन ते तीन फूट उंचीचे गवत वाढलेले असल्यामुळे खचलेला रस्ता दिसून येत नाही. खचलेल्या ठिकाणी असलेला संरक्षक लोखंडी रेलिंग तुटून पडलेली असल्याने रस्ता अधिकच धोकादायक झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि कंत्राटदाराकडून मनोर पालघर रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे.