पालघर - एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असले तरी ते सहीपुरते आहेत. पण, मातोश्रीच्या संमतीशिवाय ते एकही फाईल सही करू शकत नाहीत. त्यामुळे, त्यांची अडचण झाली आहे.ते मार्ग शोधत आहेत, असा गौप्यस्फोट केंद्रीय सूक्ष्म व लघुउद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला.
हेही वाचा -मुलाच्या अंत्यविधीसाठी घेतले 500 रुपये, सावकारी छळाला कंटाळून वडिलांची आत्महत्या
'जन आशीर्वाद यात्रे'च्या निमित्ताने नारायण राणे शनिवारी वसईत आले होते. या वेळी त्यांनी नालासोपारा येथील रिजन्सी हॉलमध्ये पत्रकारांसोबत संवाद साधला. राज्याचे नगर विकास खाते मुख्यमंत्री यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे व मिलिंद नार्वेकर चालवत आहेत, असा आरोप राणे यांनी या दोघांची नावे न घेता केला. यामुळे एकनाथ शिंदे यांची अडचण झाली आहे. ते मार्ग शोधत आहेत, असा गौप्यस्फोट राणे यांनी केला.