महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या 3 नगरसेवकांसह 20 आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल

बंदच्या पार्श्वभूमीवर पालघर परिसरात तणावपूर्ण  परिस्थिती  निर्माण झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या भाजप नगरसेवकांमध्ये अरुण माने, लक्ष्मीदेवी हजारी व अलका राजपूत यांचा समावेश आहे. तसेच व्यापारी संघटनेचे अरून जैन व प्रदीप यादव यांनादेखील पोलिसांनी अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आंदोलनकर्त्यांवर कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारत बंद दरम्यान पालघरमध्ये सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांसह 20 आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल
भारत बंद दरम्यान पालघरमध्ये सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांसह 20 आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल

By

Published : Jan 29, 2020, 11:45 PM IST

पालघर -सीएए व एनआरसी विरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे भारत बंदचे आवाहन करण्यात आले. या बंद दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे 20 आंदोलनकर्ते तसेच भाजपच्या 3 नगरसेवकांसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर पालघर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

भारत बंद दरम्यान पालघरमध्ये सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांसह 20 आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या भाजप नगरसेवकांमध्ये अरुण माने, लक्ष्मीदेवी हजारी व अलका राजपूत यांचा समावेश आहे. तसेच, व्यापारी संघटनेचे अरून जैन व प्रदीप यादव यांनादेखील पोलिसांनी अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आंदोलनकर्त्यांवर कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नोटीस बजावल्यानंतर तिचे उल्लंघन करून कायद्याचा अवमान केल्याप्रकरणी नगरसेवक, व्यापारी संघटनांचे व राजकीय पदाधिकारी यांच्यावरही पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर संध्याकाळी उशिरा अटक करण्यात आलेल्या सर्वांना पालघर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

बंद दरम्यान आंदोलनकर्ते, भाजप पदाधिकारी व नगरसेवक तसेच व्यापारी संघटना अशा दोन गटात वाद निर्माण झाल्याने पोलिसांनी दुपारच्या सुमारास लाठीचार्ज केला. बंदच्या अनुषंगाने काही जणांना नोटीस बजावल्यानंतरही त्यांनी या नोटीसचे उल्लंघन करून पोलिसांना धक्काबुक्की केली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून लाठीमार करावा लागला, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details