पालघर- परिवहन सेवा सुरू करण्यासाठी भाजपाने आंदोलन केले. पण हे आंदोलन भाजपाला महागात पडले आहे. याप्रकरणी १४ पदाधिकार्यांसह शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महापालिकेची परिवहन सेवा सुरू करावी, या मागणीसाठी आक्रमक झालेल्या भाजपाने सोमवारी महापालिकेच्या मुख्यालयाजवळ आंदोलन केले. मात्र, या आंदोलनादरम्यान सोशल डिस्टनसिंग पाळले गेले नसल्याचा ठपका ठेवला गेला. यात जिल्हाध्यक्ष राजन नाईक, महिला मोर्चा अध्यक्ष प्रज्ञा पाटील, नारायण मांजरेकर, उत्तम कुमार इत्यादी पदाधिकार्यांचा त्यात समावेश आहे.
वसई विरार : आंदोलन भाजपाला पडले महागात; 14 पदाधिकाऱ्यांसह 100 जणांवर गुन्हा दाखल - भाजपा आंदोलन
२८ तारखेला परिवहन सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपाने महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनात शेकडो लोक सहभागी झाले होते. त्यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. या सर्वांवर विरार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे मोर्चे, सभा, गर्दी करणे आणि घोषणाबाजी करण्यास मनाई आदेश बजावण्यात आला होता. मात्र वसईत भाजपाने सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत शेकडोंच्या संख्येने आंदोलने सुरू केली आहेत. ४ सप्टेंबरला वीज मंडळाविरोधात भाजपने केलेल्या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या कार्यकर्त्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर कोविड सेंटरमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाने आंदोलनाचा इशारा दिला होता. कोविडमुळे भाजपाच्या आंदोलनाला पोलिसांनी मनाई केली होती. आता २८ सप्टेंबरला परिवहन सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपाने महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनात शेकडो लोक सहभागी झाले होते. त्यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. या सर्वांवर विरार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.