महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

व्हाट्सॲपवर वादग्रस्त पोस्ट, एका ग्रुपच्या दहा अॅडमिनसह अकरा जणांवर गुन्हा दाखल

व्हाट्सॲप ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट करणे तरुणांना चांगलेच महाग पडले आहे. त्यामुळे एका व्हाट्सॲप ग्रुपच्या दहा अॅडमिनसह पोस्ट करणारा, अशा 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे.

बोईसर पोलीस ठाणे
बोईसर पोलीस ठाणे

By

Published : Apr 13, 2020, 5:54 PM IST

पालघर- व्हाट्सॲप ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी व्हाट्सॲप ग्रुप ॲडमिन व पोस्ट टाकणाऱ्या सदस्यावर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी


बोईसर येथे एका व्हॉट्सॲप ग्रुपवर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, एकोप्यात बाधा निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग होईल या दृष्टिकोनातून व्हाट्सअपवर एक पोस्ट टाकण्यात आली. या ग्रुपवर प्रसारित आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांना ट्विटरवरुन तक्रार प्राप्त झाली होती. बोईसर पोलिसांनी त्या अनुषंगाने व्हाट्सअप ग्रुप ॲडमिन व पोस्ट टाकणाऱ्या आरोपीविरोधात माहिती घेत त्यांच्याविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात आयटी 122/2020 भा.दं.वि.चे कलम 153 (अ), (ब), 505 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे चुकीचे अथवा धर्माच्या, समाजाच्या भावना दुखावतील व समाजात तेढ निर्माण होईल, असे कृत्य करू नये. तसे आढळल्यास ऍडमिन व पोस्ट टाकणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई करण्यात येईल. तसेच पालघर जिल्ह्यातील सर्व व्हाट्सॲप ग्रुप ॲडमिन यांनी ग्रुपची सेटिंग 'सेंड मेसेज ग्रुप ॲडमिन ओन्ली' असे करावे व प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी केले आहे.

हेही वाचा -तारापूर औद्योगिक वसातीतील कंपनीत स्फोट, दोघांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details