वाढवण किनारपट्टीवर तांत्रिक बिघाडामुळे अडकले जहाज - मुंबई
मुंबईकडून सुरतकडे रवाना होणारे जहाज तांत्रिक बिघाडामुळे रस्ता भरकटून वाढवण किनारपट्टीवर अडकून पडले आहे. किनाऱ्यालगत खडकाळ भाग असल्याने जहाजाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
![वाढवण किनारपट्टीवर तांत्रिक बिघाडामुळे अडकले जहाज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4030833-thumbnail-3x2-ship3.jpg)
वाढवण किनारपट्टीवर तांत्रिक बिघाडामुळे एक मालवाहू जहाज अडकले आहे
पालघर -जिल्ह्यातील वाढवण किनारपट्टीवर एक मालवाहू जहाज आल्याने ते पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. हे जहाज कुठून आले याबाबत वाणगाव पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली.
वाढवण किनारपट्टीवर तांत्रिक बिघाडामुळे एक मालवाहू जहाज अडकले आहे