महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारचा अपघात; कोणतीही जीवितहानी नाही - कारचा अपघात

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारचा अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

car crashed on the Mumbai-Ahmedabad National Highway
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारचा अपघात; कोणतीही जिवीतहानी नाही

By

Published : Jun 15, 2021, 3:31 PM IST

पालघर - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पडोसपाडा येथे कारचा अपघात झाला. अपघातग्रस्त कार डिव्हायडरमध्ये जाऊन अडकली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

डिव्हायडरमध्ये अडकली कार -

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पडोसपाडा गावच्या हद्दीत एका कारचा भीषण अपघात घडला आहे. महामार्गावर गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीच्या डिव्हायडरच्या मधोमध कार जाऊन अडकली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कारमधून प्रवास करत असलेले राजेश मचाडो व नैरीना राजेश मचाडो यांनाही या अपघातात कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले व डिव्हायडरमध्ये अडकलेली कार बाहेर काढण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details