महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 19, 2020, 6:40 PM IST

Updated : Dec 19, 2020, 6:46 PM IST

ETV Bharat / state

श्रमजीवी संघटनेच्या मागणीला यश; खावटी योजनेच्या वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया रद्द

श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्यस्थरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांनी वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया रद्द करून सपूर्ण ४००० रुपये रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा (DBT) करण्याची मागणी केली होती. तसेच याबाबत सतत पाठपुरावा करून मान राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. श्रमजीवी संघटनेच्या या मागणीला यश मिळाले आहे.

खावटी योजना वस्तू खरेदी निविदा प्रक्रिया रद्द
खावटी योजना वस्तू खरेदी निविदा प्रक्रिया रद्द

पालघर - खावटी योजनेच्या वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया रद्द करून संपूर्ण ४००० रुपये रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा (DBT) करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. यामुळे श्रमजीवी संघटनेच्या मागणीला मोठे यश मिळाले आहे.

श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्यस्थरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांनी वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया रद्द करून सपूर्ण ४००० रुपये रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा (DBT) करण्याची मागणी केली होती. तसेच याबाबत सतत पाठपुरावा करून मान राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. श्रमजीवी संघटनेच्या या मागणीला यश मिळाले आहे. निविदा प्रक्रिया रद्द करून ४ हजार रुपये रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे विवेक पंडित यांनी स्वागत केले आहे.

श्रमजीवी संघटनेच्या मागणीला यश

हेही वाचा -पुणे विदयापीठात आता गिर्यारोहणाचे धडे.. विद्यापीठ पातळीवर अभ्यासक्रमाचा समावेश

खावटी योजनेची वस्तू खरेदी तत्काळ थांबवण्याबाबत केला होता पत्रव्यवहार

खावटी योजनेच्या अंमलबावणीतील दिरंगाई व अनियमिततेमुळे तसेच लाभार्थ्यांचे स्थलांतर झाल्यामुळे त्यांच्यापर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचू शकणार नाहीत. त्यामुळे सदर खावटी योजनेची वस्तू खरेदी तत्काळ थांबवण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विवेक पंडित यांनी सविस्तर पत्र लिहिले होते.

४००० रुपये रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा (डीबीटी) करण्याचा निर्णय

कोरोना महामारीच्या काळात आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने खावटी योजनेतून लाभार्थी कुटुंबाला २००० रुपये रोखीने त्यांचा बँक खात्यात व २००० रुपयाची मदत अन्नधान्याच्या स्वरूपात देण्याचे जाहीर केले. परंतु आदिवासी विकास महामंडळाकडून खरेदी प्रक्रियेत नेहमीच भ्रष्टाचार होत असल्याचे वेळोवेळी उघड झाले. या खावटी योजनेच्या वस्तू खरेदीमध्ये भ्रष्टाचार होणार असल्याची भीती विवेक पंडित यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया रद्द करून थेट DBT ने लाभार्थ्यांच्या खात्यात सर्व ४००० रक्कम लाभार्त्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी विवेक पंडित यांनी केली होती. आता संपूर्ण ४००० रुपये रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा (DBT) करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे.

खावटी योजना वस्तू खरेदी निविदा रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत

खावटी योजनेच्या वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी केले आहे. आता खावटी योजनेचा पूर्ण लाभ प्रत्येक आदिवासी लाभार्थ्यांच्या खात्यात जाणार असून कोणत्याही भ्रष्टाचाराला संधी उरली नसल्याचे मत पंडित यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उप मुख्यमंत्री अजित पवार तसेच, निविदा रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा दिलेल्या आमदारांचेदेखील विवेक पंडित यांनी आभार मानले आहेत.

हेही वाचा -पीएमपीएल बस चौफुलापर्यंत यावी, प्रवाशांची मागणी

Last Updated : Dec 19, 2020, 6:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details