महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

21 किलोमीटर धावत 'कंडक्टर काका' पोहोचले कामावर; कर्तव्यदक्षतेचे कौतुक - वाहक देविदास जयसिंग राठोड

देविदास जयसिंग राठोड हे पालघर एसटी आगारात वाहक म्हणून 17 वर्षांपासून कार्यरत असून मनोर या गावी ते आपल्या कुटुंबासह राहतात. सध्या ते पालघर येथून मध्य मुंबई डेपोमध्ये बसची वाहतूक करत आहेत. मुंबईतील केईएम रुग्णालयात 25 डॉक्टर आणि परिचारिकांना पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

देविदास जयसिंग राठोड
देविदास जयसिंग राठोड

By

Published : Apr 26, 2020, 11:34 AM IST

पालघर - येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या देविदास जयसिंग राठोड यांनी कार्यतत्परता आणि कर्तव्याचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. कोरोना संकटाच्या काळात अत्यावश्यक सेवा बजावणाचे काम देविदास यांच्याकडे असून ड्युटीवर पोहोचण्यासाठी त्यांना मनोर ते पालघर 21 किलोमीटरची पायपीट करावी लागत आहेत. आजवर त्यांनी चारवेळा हा प्रवास धावत पूर्ण केला असून त्यांच्या कर्तव्यदक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

देविदास जयसिंग राठोड हे पालघर एसटी आगारात वाहक म्हणून 17 वर्षांपासून कार्यरत असून मनोर या गावी ते आपल्या कुटुंबासह राहतात. सध्या ते पालघर येथून मध्य मुंबई डेपोमध्ये बसची वाहतूक करीत आहेत. मुंबईतील केईएम रुग्णालयात 25 डॉक्टर आणि परिचारिकांना पोहचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. या जबाबदारीच्या पूर्तीसाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत असून असे असले तरीही देविदास आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत.

देविदास रोज सकाळी कामावर हजर राहण्यासाठी आपल्या मनोर गावातील घरापासून पाण्याच्या दोन-तीन बाटल्या घेऊन धावत पालघरच्या दिशने निघतात. वाटेत अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या ट्रकला कधी-कधी हात करून जातात. एसटी महामंडळात आपण वाहक असून अत्यावश्यक सेवा देण्याची जबाबदारी माझ्यावरही असल्याचे पास दाखवून ते ट्रक ड्रायव्हरला विनंती करतात. ट्रक ड्रायव्हरने त्यांना वाहनातून पालघरपर्यंत सोडले तर ठीक, अन्यथा ते धावतच पालघरच्या दिशेने निघतात. देविदास यांचा हा दिनक्रम सुरूच आहे.

कामावर पोहोचण्यासाठी देविदास यांनी चारवेळा पालघर ते मनोर प्रवास धावत पूर्ण केला आहे. योग्य वेळेत पोहोचण्यासाठी त्यांनी चक्क स्वत:सोबतच मॅरेथॉन सुरू केली असून ती जिंकलीही. पालघर एसटी डेपोत कामावर हजर राहण्यासाठी सध्या ते दररोज सकाळी 6 वाजताच्या दरम्यान धावण्यास प्रारंभ करतात व आपल्या ड्युटीवर हजर राहतात. 3 वाजता दादर येथून बस घेऊन पालघरला सायंकाळी 5 वाजता पोहोचतात. त्यानंतर, त्यांचा पुढील मनोर येथे 21 किमीचा परतीचा प्रवास सुरू होतो.

विशेष म्हणजे त्यांना पूर्वीपासूनच धावायची आवड असून ते नेहमी कामावर जाण्यापूर्वी दररोज सकाळी 'रनिंग' करतात. या आवडीतूनच त्यांनी कित्येक मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवला असून त्यांना पुरस्कारही प्राप्त झाले आहे. मात्र, कोरोना संकटाच्या या कठीण काळात देविदास राठोड यांच्या कर्तव्यदक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

देविदास यांना आता पर्यंत मिळालेले पुरस्कार -
21 किमी मॅरेथॉन स्पर्धेत राष्ट्पती पुरस्कार 14 मे 2012
2015, 2016, 2017, 2018, 2019 पाच वर्षे वसई ऑलस्टिक 21 किमी मॅरेथॉन प्रथम
2019 पोलीस कमिशनर नाशिक केनियाच्या स्पर्धा 5 वा क्रमांक (हे अंतर 3 तास 25 मिनिटात )
जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था झाडपोली अयोजित 21 किमी प्रथम क्रमांक
कोल्हापूर मॅरेथॉन 21 किमी 4 था क्रमांक
नागपूर मॅरेथॉन 21 किमी 5 वा क्रमांक (18 हजार स्पर्धक)
पुणे मॅरेथॉन 21 किमी 6 वा क्रमांक
नाशिक लोकमत आयोजित 21 किमी 4 था क्रमांक

ABOUT THE AUTHOR

...view details