महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बांधकाम व्यवसायिक निशांत कदम यांची निर्घृण हत्या, मध्यरात्री ऑफिसला जाताना घडली घटना - पालघर हत्या न्यूज

विरारमध्ये बिल्डर निशांत कदम यांची अज्ञात आरोपींनी हत्या केली आहे. निशांत यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. दरम्यान, आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Nishant Kadam murdered
Nishant Kadam murdered

By

Published : Sep 6, 2021, 12:24 PM IST

Updated : Sep 6, 2021, 1:37 PM IST

विरार (पालघर) :बिल्डर निशांत कदम यांची अज्ञात आरोपींनी हत्या केली आहे. धारधार शस्त्राने निशांत यांच्यावर सपासप वार करण्यात आले आहेत. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमरास अज्ञातांनी कदम यांना रस्त्यात रोखून हत्या केल्याचे समोर आले आहे.

आरोपी फरार

विरार पूर्व फुलपाडा परिसरातील बांधकाम व्यवसायिक निशांत कदम यांची अज्ञात आरोपींनी धारधार शस्त्रांनी सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल (5 सप्टेंबर) मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास कदम आपल्या राहत्या घरातून कार्यालयात जात होते. यावेळी आरोपींनी त्यांच्यावर पाळत ठेवली. त्यानंतर अंधार असलेल्या ठिकाणी आरोपींनी त्यांची अडवणूक केली. यानंतर कदम यांच्यावर धारधार शस्त्राने डोक्यात व अंगावर वार केले. आरोपींनी केलेल्या गंभीर हल्ल्यात कदम यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी फरार झाले.

आर्थिक वादातून हत्या?

याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेतला जात आहे. निशांत कदम यांना काही दिवसांपासून फोनवरून धमक्याचे फोन येत असल्याची माहिती समोर येत आहे. आर्थिक वादातून आरोपींनी हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा -खळबळ! करुणा मुंडेंच्या गाडीत आढळला पिस्तूल, धनंजय मुंडेंच्या घातपाताची शक्यता?

Last Updated : Sep 6, 2021, 1:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details