पालघर-आई आजारी आहे म्हणून दिल्ली गाठायची आणि राज्याच्या सीमा बंद आहेत आणि रोजगारही ठप्प झाला अशातच पैसे नाहीत, अत्यावश्यक सेवा वाहतूक वगळता इतर वाहतूक बंद झालेली अशा परिस्थीत करावे काय, या विवंचनेत असलेल्या नवी मुंबईतील आकाश नावाच्या तरुणाने गाव गाठण्याच्या इच्छेने चक्क सायकलने प्रवास सुरू केला.
टायर फुटलेल्या सायकलीवर मुंबईहून दिल्लीला निघाला तरुण, कुडुसच्या दोन मित्रांनी केली मदत - महाराष्ट्र लॉकडाऊन
सायकलने प्रवास सुरू असताना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी जवळ त्याच्या सायकलचा टायर फुटला तरी तो डगमगाता त्याने फुटलेल्या टायरवरच चालतच भिवंडी -वाडा यामार्गावरील 40 ते 50किमी अंतर कापले. एखादे दुकान मिळेल तर टायर बदलून घेईन, अशी मनात खुण गाठ बांधत त्याने पालघर जिल्ह्यातील कुडुस गाव गाठले.

सायकलने प्रवास सुरू असताना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी जवळ त्याच्या सायकलचा टायर फुटला तरी तो डगमगाता त्याने फुटलेल्या टायरवरच चालतच भिवंडी -वाडा यामार्गावरील 40 ते 50किमी अंतर कापले. एखादे दुकान मिळेल तर टायर बदलून घेईन, अशी मनात खुण गाठ बांधत त्याने पालघर जिल्ह्यातील कुडुस गाव गाठले. येथे त्याला माणुसकीचा झरा वाहत असल्याचा प्रत्यय आला. तो जात असताना कुडुस येथील स्वप्निल जाधव, रुकसाद शेख हे दोघे मित्र उभे होते. यात स्वप्निलने हा तरुण दोन बैग सायकल घेऊन कुठे चाललाय, हे विचारण्यासाठी त्याला बोलावून घेतले.
आकाशने तो नवी मुंबईतील कोपर खैरने येथून आलो आहे. माझी आई आजारी आहे. मला दिल्लीला जायचे आहे, पैसे नाहीत, असे सांगितले. त्याने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वासाने आम्ही त्याला मदत केल्याचे जाधव आणि शेख सांगतात. स्वप्निल जाधव व त्याचा मित्र रुकसाद यांनी त्या सायकलस्वाराची विचारपूस करुन त्याच्या सायकलचा फुटलेला टायर बदलून दिला. तसेच काही आर्थिक मदत देऊन रवाना केले. आई आजारी आहे म्हणून तो आता दिल्लीच्या दिशेने वाटचाल करित आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता फक्त माणुसकीचा आणि मदतीचा झरा वाहताना दिसतोय.