महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोबाईल चार्जिंगला लावताना वीज कोसळल्याने तरुण जखमी; डाहे गावातील घटना - डाहे

मोबाईल चार्जिंगला लावत असताना अचानक वीज कोसळल्याने एक तरुण गंभीररित्या जखमी झाला. त्याला वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले.

जखमी अमोल चोबल

By

Published : Jul 23, 2019, 1:18 PM IST

Updated : Jul 23, 2019, 3:05 PM IST

पालघर (वाडा) - दिवसभर ढगाळ वातावरण, विजेचा गडगडात मात्र पाऊस येत नसल्याने नागरिक इलेक्ट्रीक उपकरण हाताळत असल्याचे आपण बघितलेच असेल. पण, अशा वातावरणात अचानक बदल होऊन अपघातही घडत असतात. अशीच एक घटना जिल्ह्यातील डाहे या गावात घडली आहे. यात मोबाईल चार्जिंगला लावत असताना अचानक घरावर वीज कोसळल्याने डाहे गावातील तरूण गंभीररित्या जखमी झाला. अमोल चोबल असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना 22 जुलै रोजी रात्री 8:30 वाजता घडली असून जखमीला वाडा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

जखमी अमोल चोबल


डाहे गावातील रहिवासी अमोल हा सोमवारी संध्याकाळी शेतातून घरी परतला. बॅटरी डाऊन असल्याने त्याने मोबाईल चार्जिंगला लावायला घेतला. याच दरम्यान वीज कोसळल्याने मोबाईलद्वारे अमोलच्या उजव्या हाताला त्याचा झटका जोरदार झटका बसला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे अमोल चांगलाच जखमी झाला असून मोबाईलचेही नुकसान झाले आहे. जखमी अमोलला वाडा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.


या विजेचा फटका परिसरामधील इतर घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंना देखील बसला. तेथील रहिवास्यांचे दूरसंच व इलेक्ट्रीक उपकरणे निकामी झाल्याचे डाहे गावातील ग्रामस्थांनी सांगितले.

Last Updated : Jul 23, 2019, 3:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details