महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रानशेत येथे मुदतबाह्य औषधांच्या बाटल्या उघड्यावर फेकल्या ; कारवाईची मागणी

डहाणू तालुक्यातील रानशेत येथील परिसरात मुदत संपलेली औषधांच्या बाटल्या व सिरिफ्ट उघडयावर फेकण्यात आल्या.

औषधांच्या बाटल्या उघड्यावर फेकल्या
औषधांच्या बाटल्या उघड्यावर फेकल्या

By

Published : Jan 7, 2021, 4:32 PM IST

Updated : Jan 7, 2021, 8:46 PM IST

पालघर -डहाणू तालुक्यातील रानशेत येथील परिसरात मुदत संपलेली औषधांच्या बाटल्या व सिरिफ्ट उघडयावर फेकण्यात आल्या. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होवून भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, अशाप्रकारे औषधे उघड्यावर फेकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

उघड्यावर फेकून देण्यात आली औषधे-

डहाणू तालुक्यातील डहाणू-जव्हार रोडवर रानशेत येथील परिसरात मुदत संपलेल्या औषधांच्या बाटल्या व सिरिफ्ट उघडयावर टाकून देण्यात आल्या आहेत. ही औषधे खोकला, ताप, व इतर आजारावर्ती वापरण्यात येतात. अशा प्रकारच्या औषधी नष्ट करण्याचे सरकारी नियम आहेत. मात्र हे नियम पायदळी तुडवण्यात आले. ही औषधे नेमकी कुणाची आहेत. हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दोषींवर कारवाईची स्थानिकांची मागणी-

मुदतबाह्य औषधे उघड्यावर टाकून देता येत नाहीत किंवा ती जाळताही येत नाहीत. मुदतबाह्य टॅबलेट्स असतील तर त्या पाण्यात विरघळवून नष्ट करण्याचे आदेश आहेत. तरी देखील या नियमांचे पालन होतांना दिसत नाही. मुदत संपल्यानंतर धोकादायक ठरत असलेल्या मुदतबाह्य औषधांची विल्हेवाट लावण्याच्या महत्वाच्या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. मुदतबाह्य औषधे नष्ट करण्याचे नियम पायदळी तुडवत रानशेत येथील परिसरात औषधे उघड्यावर फेकून देण्यात आले.

मुदत संपलेल्या औषधांची विल्हेवाट कशी लावावी, याचे नियम आरोग्य विभागाने दिले आहेत. परंतु, या नियमांना थेट केराची टोपलीच दाखवली आहे. यामुळे नागरिकांच्या तसेच जनावरांच्या देखील आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याबाबत तात्काळ जिल्हा प्रशासनाकडून चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

हेही वाचा- नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Last Updated : Jan 7, 2021, 8:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details