महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर: धावत्या रेल्वेमधून अॅसिडची बाटली फेकली बाहेर; तीन ट्रॅकमन जखमी - गुजरात एक्सप्रेस अॅसिड हल्ला

पालघरमध्ये धावत्या रेल्वेमधून अॅसिडने भरलेली बाटली बाहेर फेकल्याने ते अंगावर पडून तीन ट्रॅकमन जखमी झाले. त्यांच्या चेहऱ्याला, हाताला आणि पायाला भाजले आहे.

धावत्या रेल्वेमधून अॅसिडची बाटली फेकली बाहेर
धावत्या रेल्वेमधून अॅसिडची बाटली फेकली बाहेर

By

Published : Nov 29, 2019, 7:05 PM IST

पालघर - धावत्या रेल्वेमधून अॅसिडने भरलेली बाटली बाहेर फेकल्याने ते अंगावर पडून तीन ट्रॅकमन जखमी झाले. गुजरातहून मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात जाणाऱ्या गुजरात एक्सप्रेसमध्ये ही घटना झाली.


अज्ञाताने केळवे रोड स्थानकाजवळ अॅसिडची बाटली बाहेर फेकली. त्यावेळी रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम करत असलेल्या ट्रॅकमनच्या अंगावर हे रसायन पडले. या घटनेत तीन ट्रॅकमन जखमी झाले असून त्यांच्या चेहऱ्याला, हाताला आणि पायाला भाजले आहे.

हेही वाचा - गेट वे ऑफ इंडियाचा समुद्रकिनारा बोटिंगसाठी चार दिवस राहणार बंद
धावत्या रेल्वेमधून अॅसिड फेकणाऱ्या अज्ञाताविरोधात पालघर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र, हे अॅसिड फेकणारी व्यक्ती रेल्वेमध्ये अॅसिड घेऊन का प्रवास करत होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details