नंदोलीया ऑरगॅनिक केमिकल स्फोट; आमदार राजेश पाटील यांनी मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांची घेतली भेट
स्फोटानंतर कंपनीतून 20 पैकी 14 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, या भीषण स्फोटात संदीप कुशवाहा, ग्रीजेश मौर्या या दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर मोहम्मद मोहसीन अल्ताफ (30 वर्ष), दिलीप गुप्ता (28 वर्ष), उमेश कुशवाहा (22 वर्ष), प्रमोदकुमार मिश्रा (35 वर्ष) हे जखमी आहेत. जखमींवर बोईसर येथील तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पालघर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील नंदोलीया ऑरगॅनिक केमिकल कंपनीत रिॲक्टरच्या स्फोटात 2 कामगारांचा मृत्यू तर 4 कामगार गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. स्फोटात मृत व जखमी कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. याप्रकरणी कंपनी प्रशासन आणि जे कोणी दोषी असतील त्याची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी बोईसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे एका पत्राद्वारे आमदारांनी केली आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील नांदोलिया केमिकल्स या कंपनीमध्ये सोमवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे सालवड, पास्थळ, बोईसर, तारापूर, चिंचणी व किनारपट्टीच्या सर्व गावांमध्ये मोठा कंप जाणवला असून स्फोटाचा आवाजाने 10 किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला.
नंतर बोईसर पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी शोध कार्य सुरू केले. कंपनीत स्फोट झाला त्यावेळी 20 कमगार काम करत होते. बचावकार्यादरम्यान गॅस गळती सुरू झाल्याने अग्निशमन दलाला काही वेळ अडथळा निर्माण झाला, मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाल यश आले. स्फोटानंतर कंपनीतून 20 पैकी 14 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, या भीषण स्फोटात संदीप कुशवाहा, ग्रीजेश मौर्या या दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर मोहम्मद मोहसीन अल्ताफ (30 वर्ष), दिलीप गुप्ता (28 वर्ष), उमेश कुशवाहा (22 वर्ष), प्रमोदकुमार मिश्रा (35 वर्ष) हे जखमी आहेत. जखमींवर बोईसर येथील तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.