महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना अटक, बोईसर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - चेन स्नॅचिंग न्यूज

चेन स्नॅचिंग करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना बोईसर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. राहूल उर्फ लंगडा रवी शर्मा व जतीन उर्फ बंड्या भाऊ पोटींदे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Boisar Local Crime Branch   arrested 2 people  for chain snatchingg
चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना अटक

By

Published : Jul 9, 2020, 4:33 PM IST

पालघर -चेन स्नॅचिंग करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना बोईसर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. राहूल उर्फ लंगडा रवी शर्मा व जतीन उर्फ बंड्या भाऊ पोटींदे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एकूण ८५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल, चोरीच्या गुन्ह्यातील मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे.

बोईसर, अमेयपार्क येथे एक महिला रिक्षातून आपल्या घरी चालली असताना मोटार सायकलवरून आलेले दोन अनोळखी चोरटे महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून पळून गेले. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात कलम ३९२, ३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा पालघर अंतर्गत बोईसर युनिट पथकाने घटनास्थळी माहिती घेऊन समांतर तपास सुरू केला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राहुल उर्फ लंगडा रवी शर्मा (वय २७, रा. बोईसर) जतिन उर्फ बंड्या भाऊ पोटिंदे (वय २४, रा. टेंभोडे) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता, दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच आरोपींनी डहाणू येथे देखील चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली आहे. या दोघांकडून डहाणू, बोईसर येथे चोरीस गेलेला ८५ हजार रुपये किंमतीचा (मंगळसूत्र, चेन) मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल देखील पोलिसांनी हस्तगत केली आहे.

चेन स्नॅचर्सना अटक करण्याची कारवाई पोलीस निरीक्षक रविंद्र नाईक व सहायक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर युनिटचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत टेलर, सहा. फौज. सुनील नलावडे, विनायक ताम्हणे, भरत पाटील, पोलीस हवालदार. संतोष निकाळे, दिपक राऊत, संदीप सूर्यवंशी यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details