पालघर- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. या परिस्थितीत जीवनावश्यक सेवा सुरू असल्या तरी त्यातही सोशल डिस्टसिंग फार महत्त्वाचे आहे. बोईसर येथे रोज सकाळी भरणाऱ्या बाजारात भाजी विक्रेत्यांकडून सोशल डिस्टनसिंग उल्लंघन केल्याचे पहावयास मिळत आहे.
सोशल डिस्टनसिंगचे उल्लंघन करणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर बोईसर ग्रामपंचायतीची कारवाई - पालघर सोशन डिस्टंस न्यूज
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. या परिस्थितीत जीवनावश्यक सेवा सुरू असल्या तरी त्यातही सोशल डिस्टसिंग फार महत्त्वाचे आहे. बोईसर येथे रोज सकाळी भरणाऱ्या बाजारात भाजी विक्रेत्यांकडून सोशल डिस्टनसिंग उल्लंघन केल्याचे पहावयास मिळत आहे.
सोशल डिस्टनसिंग उल्लंघन करणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर बोईसर ग्रामपंचायत कारवाई
बोईसर ग्रामपंचायतकडून भाजी विक्रेत्यांना नोटीस देऊनही या भाजी विक्रेत्यांकडून याकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आले. तसेच कोरोना विषाणू संसर्गाच्या गांभीर्याचा बोईसरकरांनाही विसर पडल्याचे पहावयास मिळाले त्यानंतर आज बोईसर ग्रामपंचायतीने कठोर पावले उचलत सोशल डिस्टसिंगचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.