पालघर ( वाडा) - आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे आणि जुन्या परंपरेचे जतन म्हणजे 'बोहाडा'. आपल्या संस्कृतीचे जतन आणि देवी देवतांचे पुजन करण्यासाठी जव्हार तालुक्यातील बोराळे गावात जगदंबा मातेचा बोहाडा उत्सव साजरा करण्यात आला. शनीवार- सोमवार (११ ते १३ मे) तीन दिवस या उत्साहाचे आयोजन करण्यात आले होते.
बोराळ्यात आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा 'बोहाडा' उत्साहात साजरा
या बोहाड्यात पंचक्रोशीतील गाव, पाड्यातील आदिवासी बांधवाचा समावेश असतो. शनिवार ते सोमवार रात्री ८ वाजेपासून तर पहाटेपर्यंत हा बोहडा उत्सव सुरू होता. देवी देवतांचे मुखवटे घातलेली सोंगे या उत्सवात सहभागी झाली होती.

रामायण, महाभारतातील विविध देवदेवतांचे मुखवटे आणि वेश परिधान करुन आदिवासींचे पारंपारिक वाद्य सांबळाच्या तालावर ही सोंगे ठेका धरतात. यामध्ये गणपती, मारुती, श्री कृष्ण, महादेव, शिवाजी, रामताटी, भीम खंडेराव, चारणी, रावण, सटवय, एकादशी, असे अनेक प्रकारची सोंगे असतात. तसेच, विवीध प्रकारची मिठाई, कलाकुसरीच्या वस्तू, विविध वस्तूंची दुकाने रस्त्याच्या दोन्ही कडेला सजलेली होती.