महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर लोकसभा मतदारसंघात बोगस मतदार; बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराची तक्रार - loksabha2019

कोणताही अनुचित प्रकार करताना आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल असे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत नारनवरे यांनी सांगितले आहे.

बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव

By

Published : Apr 28, 2019, 9:57 PM IST

पालघर- लोकसभा मतदारसंघात बोगस मतदार असल्याची तक्रार बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातील वसई, नालासोपारा, बोईसर विधानसभा मतदार संघात तसेच पालघर नगरपरिषद क्षेत्रात बोगस मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत, अशी तक्रार जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत नारनवरे यांच्याकडे केली आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघात 1 जानेवारी 2018 पासून 1 लाख 27 हजार 436 नवीन मतदार नोंदणी झाली आहे. यातील सुमारे 88 हजार 958 नवीन मतदार नोंदणी वसई, नालासोपारा, बोईसर विधानसभा मतदारसंघातील आहे. त्यापैकी 60 हजार मतदार हे बोगस आहेत. तसेच पालघर नगरपरिषद क्षेत्रातील मतदान केंद्र क्रमांक 235 व 285 या केंद्रातील मतदारांची नावे ही पालघर नगरपरिषद क्षेत्र व नगरपरिषद क्षेत्राबाहेरील गावांमध्ये, अशा दोन्ही ठिकाणी आहेत, अशी लेखी तक्रार बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. बोगस मतदान होऊ नये यासाठी विशेष लक्ष देण्याची विनंतीही त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत नारनवरे यांच्याकडे केली आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघात बोगस मतदार

एकाच मतदाराचे नाव दोन ठिकाणी असतील, अशा मतदान केंद्रांवर अतिरिक्त अधिकाऱ्यांची नेमणूक करून त्या मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येईल. त्याचप्रमाणे वेब-कास्टिंगद्वारे मतदान केंद्रांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष लक्ष देण्यात येत असून, कोणताही अनुचित प्रकार करताना आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल असे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत नारनवरे यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details