पालघर - अरबी समुद्राच्या पूर्व किनारपट्टी भागातून निघालेले वादळ अरबी समुद्राच्या पश्चिम किनारपट्टी भागात पोहचले आहे. या वादळाची तीव्रता वाढल्याने पालघर जिल्ह्यातील मासेमारीसाठी गेलेले मच्छिमार बांधव अडकून पडले होते. ते आता बोटिसह परतत आहेत. या वादळात सापडलेल्या मच्छिमार बोटी सुखरूपपणे जमेल तो जवळचा किनारा गाठत आहेत.
अरबी समुद्राच्या पूर्व किनारपट्टीवरील हे चक्रीवादळ आता अरबी समुद्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकले आहे. पालघर मधील सातपाटी येथील काही बोटी मासेमारी करिता समुद्रात गेल्या होत्या. समुद्रात वादळ वाढल्याने या बोटी परतत आहेत. यातील सातपाटी भागातील काही पाच बोटींनी उंबरगाव येथे आश्रय घेतला असल्याची माहिती मच्छिमार कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष विनोद पाटील व मच्छिमार संघटनेचे पंकज पाटील यांनी सांगितले.