पालघर - राज्यासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पालघर पोलीस दलामार्फत पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे. बोईसर येथील टीमा सभागृह येथे
पालघर पोलीस दलातर्फे मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पंतगशाह कुटीर रुग्णालय जव्हार व जे जे हॉस्पिटल रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर पार पडले.
रक्त संकलनासाठी पालघर पोलीस दलाचा पुढाकार
जिल्ह्यात विविध ठिकाणी पालघर पोलीस दलामार्फत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार असून, याद्वारे 2000 रक्तपिशव्या संकलन करण्याचे उद्दिष्ट पालघर पोलीस दलाने समोर ठेवले आहे. त्यामुळे कोरोना काळात मागील वर्षभरापासून अहोरात्र आपले कर्तव्य बजावणारे पोलीस पुन्हा एकदा जनतेसाठी पुढे सरसावल्याचे पाहायला मिळत आहे.