पालघर -कोरोना संसर्गाच्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांकडून रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर निर्धार संघटनेचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते कुंदन संखे यांच्यामार्फत बोईसर येथील डॉ.स.दा वर्तक विद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोईसर येथे रक्तदान शिबिर संपन्न - निर्धार संघटना
बोईसर येथील डॉ.स.दा वर्तक विद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. निर्धार संघटनेचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते कुंदन संखे यांच्यामार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिर
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करत हे रक्तदान शिबिर पार पडले. नागरिकांनी या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. शिबिरात 111 बाटल्या रक्त जमा करण्यात आले असून हे रक्त जव्हार येथील महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढीला देण्यात आले.