महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विरारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत रक्तदान शिबिर संपन्न - blood donation bva

रक्तदान शिबिराचे आयोजन विरार पूर्वेकडील कोपरी गावामध्ये आयोजित करण्यात आले होते. ज्यात दोनशेहून अधिक नागरिकांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांची सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून रक्तदान केले.

blood donation camp
विरारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत रक्तदान शिबिर संपन्न

By

Published : May 15, 2020, 6:01 PM IST

Updated : May 15, 2020, 11:53 PM IST

पालघर (विरार) - सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये मुंबईतील रुग्णालयात ऑपरेशनसाठी लागणाऱ्या रक्ताचा तुटवडा जाणवू नये, यासाठी शासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला वसईतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सत्ताधारी बहुजन विकास आघाडी आणि यंग स्टार्स ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने वसई, नालासोपारा, बोईसर विधानसभा क्षेत्रात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. यावेळी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून रक्तदान केले जात आहे.

विरारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत रक्तदान शिबिर संपन्न

आज शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील रक्तदान शिबिराचे आयोजन विरार पूर्वेकडील कोपरी गावामध्ये आयोजित करण्यात आले होते. ज्यात दोनशेहून अधिक नागरिकांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांची सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून रक्तदान केले. यावेळी रक्तदान शिबिरात अंध, अपंग, नागरिकांनी रक्तदान करून कोरोनाशी दोन हात करून इतर नागरिकांनाही रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, एक वर्षाच्या बालिकेने आपल्या आईसह रक्तदान शिबिरात भेट देऊन इतर नागरिकांनाही रक्तदान करण्याचे आवाहन केले.

Last Updated : May 15, 2020, 11:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details