पालघर - तारापूर औद्योगिक वसाहतीतील आरती ड्रग्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत स्फोट झाला. या स्फोटात कंपनीतील एक कामगार जखमी झाला आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीत स्फोट; कामगार जखमी - Tarapur blast
तारापूर औद्योगिक वसाहतीतील, प्लॉट नंबर टी 150 मधील आरती ड्रग्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत स्फोट झाला. यामध्ये एक कामगार जखमी झाला आहे.

कंडेन्सर फुटला
पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीतील, प्लॉट नंबर टी 150 मधील आरती ड्रग्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक महिन्यांपासून या कंपनीत बंद असलेल्या बॉयलरच्या कंडेन्सरमध्ये अचानक दबाव वाढल्याने तो फुटला आणि हा स्फोट झाला. सध्या येथील स्थिती नियंत्रणात आहे.
या स्फोटात कंपनीतील एक कामगार जखमी झाला आहे. अभय सिंग असे या जखमी कामगाराचे नाव आहे. उपचारासाठी त्यांना बोईसर येथील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.