पालघर - संपूर्ण जिल्ह्यात जवळपास 75 हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती केली जाते. वाडा कोलमप्रमाणे पांढऱ्या तांदळाच्या अनेक जाती प्रचलित आहेत. मात्र जिल्ह्यातील पडघे येथील मिलिंद घरत या शेतकऱ्याने पांढऱ्या तांदळाच्या पारंपरिक भात शेतीला बगल देत काळ्या तांदळाची लागवड केली आहे.
पालघरमध्ये 'काळा तांदुळ' ; प्रगतशील शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग काळ्या तांदळाची लागवड मिलिंद घरत यांनी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत त्याला आधुनिकीकरणाची जोड दिली आहे. मिलिंद घरत यांनी आपल्या अर्धा एकर शेत जमिनीवर काळ्या तांदळाची लागवड केली. सुरुवातीला त्यांनी ४ किलो काळ्या भाताचे वाण बिहारमधील पटणा येथून आणले. भाताचे रोप तयार झाल्यानंतर मिलिंद घरत यांनी दोन दोन काड्यांची रोपणी केली. या भात लागवडीसाठी त्यांनी संपूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर केला. पांढऱ्या तांदळाचे भातपीक तयार होण्यासाठी साधारणतः ८० दिवसांचा कालावधी लागतो. मात्र साधारण १४० ते १५० दिवसांनंतर हे या तांदळाचे पीक तयार होते. मिलिंद घरत यांनी पांढऱ्या तांदळाच्या पारंपारिक भातशेती लागवडीला बगल देत एक नाविन्यपूर्ण प्रयोग करत काळ्या तांदळाची लागवड केली असून पालघर जिल्ह्यात 'फॉरबीडन राईस'ची लागवड करण्याचा प्रगतशील प्रयोग साकारला आहे.
जिल्ह्यातील पडघे येथील मिलिंद घरत या शेतकऱ्याने पांढऱ्या तांदळाच्या पारंपरिक भात शेतीला बगल देत काळ्या तांदळाची लागवड केली आहे. पांढऱ्या तांदळापेक्षा जास्त बाजारभाव पालघरमध्ये पिकणारा कोलम तसेच इतर पांढरा तांदूळ ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने मिळतो. मधुमेह, हायपर टेन्शन व इतर आजारांवर उपयुक्त व गुणकारी असलेल्या या कळ्या तांदळाला शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या काळ्या तांदळाला बाजारपेठेत १५० ते २०० रुपये प्रतिकिलो तसेच त्यापेक्षा अधिक दराने देखील बाजारात विकला जातो.
काळा तांदूळ अनेक आजारांवर गुणकारी
मोठमोठ्या शहरांमध्ये काळ्या तांदळाला मोठ्या प्रमाणात आहे. कार्वोहायड्रेट युक्त असलेले हे काळे तांदूळ शुगर व हृदयरोग असलेल्या रुग्णांना खूप फायदेशीर आहे. काळे तांदूळ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील नियंत्रित करता येते. त्या तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याकारणाने ते पचण्यास उपयुक्त असतात. सोबतच अँटीऑक्सीडेंट तत्त्व असल्याने ते डोळ्यांसाठी देखील उपयोगी ठरतात. सामान्य तांदळाच्या तुलनेमध्ये काळा तांदूळ शिजायला फार वेळ लागतो. काळ्या तांदळापासून मिळणारे फायदे आरोग्य स्वस्थ व मजबूत ठेवण्यासाठी याचा फायदा होतो. या काळ्या तांदळामधील फायटोकेमिकल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवते. हृदयामधील धमण्यांमध्ये अर्थोस्क्लेरोसिस प्लेक फर्मेशनची संभावना कमी करते. यामुळे हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोकची संभावना कमी होते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी काळे तांदूळ अतिशय फायदेशीर ठरतात. या तांदळामध्ये असलेल्या फायबरमुळे अन्नपचन व्यवस्थित होते. काळ्या तांदळामध्ये असलेल्या एंथोसायनिन नावाच्या अँटीऑक्सीडेंटमुळे कार्डिओव्हेस्क्युलर आणि कॅन्सरसारख्या आजारापासून आपले संरक्षण करते. काळ्या तांदळामधील अँटीऑक्सीडेंट तत्त्व हे त्वचा व डोळ्यांसाठी देखील फायदेशीर असते.