पालघर- जिल्ह्यात युती विरोधात भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी बंड पुकारले आहे. पालघरमधील विधानसभेची जागा युतीकडून शिवसेनेसाठी सोडल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. भारतीय जनता पक्षाचे बोईसरचे पालघर विधानसभेसाठी इच्छुक संतोष जनाठे यांनी पक्षाविरोधात बंड केले असून उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
बोईसर : भाजपच्या संतोष जनाठेंचे पक्षाविरोधात बंड; उद्या भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज
बोईसरमधील विधानसभेची जागा युतीकडून शिवसेनेसाठी सोडल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बोईसर विधानसभेसाठी भाजपचे पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. त्यांना उमेदवारी न दिल्यास सर्व पदाधिकारी पदांचा राजीनामा देऊन उद्या संतोष जनाठे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आहे
आज पालघर मधील मनोर येथे शेकडो कार्यकर्ते आणि वसई, नालासोपारा, पालघर, बोईसर या चारही विधानसभेतील शेकडो पदाधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत युतीचे काम न करण्याचा पवित्रा भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
बोईसर विधानसभेसाठी भाजपचे पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. जनाठे यांना उमेदवारी न दिल्यास सर्व पदाधिकारी पदांचा राजीनामा देऊन उद्या संतोष जनाठे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आहे